Ahmednagar News : दोन दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी अन महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईवर वादळाचे सावट पाहायला मिळाले. या वादळामुळे मुंबई सह मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या काळात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत होते.

यामुळे मुंबईमधील घाटकोपर परिसरात मोठे होर्डिंग कोसळले होते. यात काही लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक जखमी झालेत. याशिवाय मोठी आर्थिक हानी देखील झाली.

या वादळाची दाहकता एवढी अधिक होती की दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाचे फोटोज आणि व्हिडिओज अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वादळाने मुंबईकरांना चांगलीच धास्ती बसवली आहे.

दरम्यान आता राजधानी मुंबईनंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना वादळाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळ येणार अशी शक्यता व्यक्त केली आहे.

खरेतर सध्या राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसत असून या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

अशातच आता पुन्हा एकदा वादळाचे संकट घोंघावत आहे. हवामान खात्याने राज्यातील अहमदनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार असा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने या संबंधित जिल्ह्यांना वादळाचा इशारा दिला आहे. यामुळे या सदर भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.

शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाला सुरक्षित ठिकाणी बांधावे. शेतमाल झाकून ठेवावा. वाऱ्याची तीव्रता अधिक राहणार असल्याने शेतात असताना आपली व आपल्या परशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ञांनी केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *