Ahmednagar Famous Picnic Spot : आपल्यापैकी अनेकांना निसर्गरम्य ठिकाणी जाऊन क्वालिटी टाईम स्पेंड करण्याची आवड असेल. वीकेंडला कुठेतरी फिरायला जाऊ असे म्हणणारे कार्यकर्ते प्रत्येक ग्रुपमध्ये असतातच. खरे तर फिरायला कुणाला नाही आवडत. यामुळे अनेकजण वीकेंडला एक ट्रिप काढतातच.
रोजच्या रुटीन आयुष्याला कंटाळून अनेकजण निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपली ट्रिप एन्जॉय करतात. यामुळे वीकेंड आला की पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी पाहायला मिळते. खरंतर पर्यटक वीकेंडला एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडतात.
निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एडवेंचर्स ऍक्टिव्हिटीज करतात. आपल्यापैकी अनेक जण अशा अनेक धोकादायक आणि डेंजर पिकनिक स्पॉटवर गेले असतील. दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक पिकनिक स्पॉटची माहिती जाणून घेणार आहोत.
वास्तविक, राज्यातील सर्वात धोकादायक पिकनिक स्पॉट हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. हे ठिकाण डोंगरदर्यांनी नटलेले आहे मात्र या ठिकाणी असेही काही भाग आहेत जिथे सूर्याची किरणे सुद्धा पडत नाहीत. या ठिकाणी उंच-उंच डोंगरदऱ्या आहेत.
येथे अतिशय अरुंद घळ आहे. ही घळ काही ठिकाणी आठ-दहा फुटाची आहे तर काही ठिकाणी अवघी तीन फुट रुंदीची आहे. म्हणजे येथून जेमतेम एक माणूस पास होऊ शकतो अशी जागा आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंना चारशे फूट उंचीच्या कडा आहेत.
यामुळे या घळीतून जाताना चित्तथरारक अनुभव अनुभवता येतो. ज्या लोकांना एडवेंचर्स ऍक्टिव्हिटीज हवी आहे अशा लोकांनी या डेंजर पॉईंटला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे.
आम्ही ज्या पर्यटन स्थळाबाबत बोलत आहोत ते आहे अहमदनगर जिल्ह्यातील सांधण व्हॅली. साम्रद या गावातून पुढे दोन तीन किलोमीटर नागमोडी वळणे घेत जाणारी ही दरी म्हणजेच सांधण व्हॅली. ही व्हॅली पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
येथे दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात. जर तुमचाही कुठे फिरायला निघण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे. या दरीतून जाणारी चिंचोळी वाट पुढे एवढी निमूळती होत जाते की, काही ठिकाणी अक्षरशा सूर्याची किरणे देखील पडत नाहीत.
आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यामध्ये ह्या व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो. येथे गेला तर तुम्हाला खऱ्या अर्थाने निसर्गाचा चमत्कार काय असतो हे समजणार आहे. कारण की, ही दरी जमिनीला भेग पडून तयार झाली असल्याचा दावा केला जातो.
कसं पोहचणार इथं
जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर आळेफाटा-संगमनेर-अकोले- राजूर-शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद या मार्गाने या व्हॅलीपर्यंत पोहोचू शकता. जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि येथे येण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला कल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे येथे भेट द्यावी लागणार आहे. दुसरीकडे जर तुम्ही नासिक येथून येत असाल तर तुम्हालाही घोटीमार्गेच या ठिकाणी भेट द्यावी लागणार आहे.