Aeroplane Mileage : आपण जेव्हाही एखादा नवीन वाहन खरेदी करतो मग ते टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो किंवा अन्य मालवाहतूक वाहन असो सर्वप्रथम आपण त्या गाडीची मायलेज चेक करत असतो. एवढेच नाही जर आपल्या फ्रेंड सर्कल मधून कोणी नवीन वाहन खरेदी केले तर आपण त्याला साहजिकच कितीचं मायलेज देत रे भावा ? असा प्रश्न विचारतो.

खरंतर, सर्वसामान्य जनता गाडी खरेदी करण्यापूर्वी त्याचे मायलेज चेक करतात, जेणेकरून ते त्यांच्या खिशाला परवडणारे आहे की नाही याचा अंदाज बांधतात आणि यानंतरच गाडीची खरेदी करत असतात.

पण तुम्ही कधी विमानच्या मायलेजचा विचार केला आहे का? एक-दोन तासाच्या विमान प्रवासासाठी प्रवाशांकडून हजारो रुपयांचे तिकीट घेतलं जातं, आंतरराष्ट्रीय प्रवासात तर तिकीट राष्ट्रीय विमान प्रवासापेक्षा महाग असते.

अशा परिस्थितीत विमान अखेर मायलेज किती देते हा प्रश्न तुम्हाला देखील पडलाचं असेल. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विमान एक लिटर इंधनात किती किलोमीटर जाऊ शकते तसेच एक मिनिटाचा प्रवास करण्यासाठी विमानाला किती इंधन लागतं? याविषयी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती मायलेज देते विमान

सर्वप्रथम आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विमानासाठी जे इंधन वापरलं जातं ते पेट्रोल आणि डिझेल पेक्षा वेगळं असतं.

दरम्यान विमानाचे मायलेज जाणून घेण्यासाठी आज आपण बोईंग 747 या भारतातील सर्वाधिक मोठ्या विमानाचे उदाहरण पाहणार आहोत.

या विमानासाठी किती इंधन लागतं हे पाहणार आहोत. या विमानाचा वेग हा 900 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. या विमानात एका वेळी 500 प्रवासी प्रवास करू शकतात.

हे विमान प्रति सेकंद चार लिटर इंधन खर्च करते. म्हणजे एका मिनिटाच्या प्रवासासाठी या विमानास 240 लिटर इंधन लागत. म्हणजेच हे विमान एक लिटर इंधना 0.8 km चं अंतर पार करू शकते.

अर्थातच हे विमान एका किलोमीटरसाठी जवळपास 12 लिटर इंधन खर्च करते. मात्र विमानाच्या श्रेणीनुसार विमानाचे मायलेज बदलते याची नोंद घ्यायची आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *