Travel News : प्रत्येकाला तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे भाग्य लाभावे असे वाटते, परंतु बजेटमुळे अनेकांची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. मात्र, IRCTC आता तुमच्यासाठी असे पॅकेज घेऊन आले आहे, ज्याद्वारे तुम्ही तीर्थक्षेत्रांना अगदी कमी बाजेमध्ये भेट देऊ शकता.
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तिच्या आगामी दक्षिण भारत दर्शनासाठी विशेष यात्रेकरू स्वदेश दर्शन पर्यटक ट्रेन चालवत आहे. 27 जानेवारी 2023 रोजी मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सीएसएमटी) येथून ट्रेन सुरू होईल.
10 रात्री 11 दिवसांच्या या दौऱ्यात दक्षिण भारतातील विविध पर्यटन शहरांना भेटी देता येणार आहोत. वशेष म्हणजे सीएसएमटी, कल्याण पुणे आणि सोलापूर या शहरांना कव्हर करेल. हा दौरा 06 फेब्रुवारी 2023 रोजी संपेल.
“या” शहरांना देणार भेटी
-म्हैसूर : महाराजा पॅलेस, ललित महल पॅलेस चामुंडी हिल्स, बंदवन गार्डन, कृष्णराजा बांध, सेंट फिलामेना चर्च आणि म्हैसूर प्राणी संग्रालय.
-बंगळुरू : लालबाग वनपस्ती उद्यान, टिपू सुलतान महाल आणि बुल मंदिर
रामेश्वरम : रामनाथ स्वामी मंदिर धनुषकोडी आणि रामेश्वरम
कन्याकुमारी : विवेकानंद रॉक मेमोरियल, कन्याकुमारी मंदिर, गांधी मंडप आणि सनसेट पॉइंट
विरुवनंतपुरम : पद्मनाभस्वामी मंदिर.
तिरुपती : भगवान बाल मंदिर आणि पद्मावती मंदिर.
IRCTC वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या तपशीलांनुसार, तीन वर्ग आहेत – कम्फर्ट (3A), स्टँडर्ड (स्लीपर क्लास) आणि बजेट (स्लीपर क्लास). कम्फर्ट क्लासमध्ये सिंगल ऑक्युपन्सीची किंमत 33,190, स्टँडर्ड क्लास 21,690 आणि बजेट क्लासची किंमत 18,790 रुपये असेल.
स्वदेश दर्शन टुरिस्ट ट्रेनचे बुकिंग IRCTC च्या अधिकृत वेबसाइट https://www.irctctourism.com/ वरून केले जाऊ शकते. याशिवाय, कोणीही IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये किंवा क्षेत्रीय कार्यालयांना देखील भेट देऊ शकतो. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल. या ट्रेनमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल.
स्वदेश दर्शन पर्यटक ट्रेन
स्वदेश दर्शन टुरिस्ट ट्रेन ही भारतातील सर्वात स्वस्त पर्यटक ट्रेनपैकी एक आहे. त्यात देशातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. धार्मिक यात्रेकरूंसाठी टूर पॅकेज देणे हा या ट्रेनचा मुख्य उद्देश आहे.