पिंपरी : मुंबई-बंगळुरू महामार्ग आणि हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क अर्थात आयटी पार्कमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड, पुनावळे आणि ताथवडे या गावांचा झपाट्याने विस्तार झाला आहे. या परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. सर्व सुख-सुविधांयुक्त अशा उच्चभू सोसायट्यांचे मोठे जाळे या भागात उभे राहिले आहे. जागा, सदनिका आणि मालमत्तांचे दर वधारले असून संपूर्ण देशभरातून नोकरदार वर्ग या परिसरात वास्तव्यास आलेला आहे.

मुळा नदीकाठी वसलेले वाकड, पिंपळे निलख आणि जवळच्या पुनावळे, ताथवडे या गावांची मुबलक पाण्यामुळे बागावती गाव अशी जुनी ओळख होती. परंतु, मागील २० वर्षात ग्रामीण भागाचे दर्शन घडविणाऱ्या या सर्वच गावांचे संपूर्ण रूपडेच पालटले आहे. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर त्यांची विकासाची वाटचाल सुरू झाली.

तर, हिंजवडी आयटी पार्क झाल्यामुळे ही गावे आता पूर्णपणे शहरीकरणात रूपांतरित झाली आहेत. वाकड, पुनावळेसारख्या भागाचा चेहरामोहरा बदलला आहे. एका बाजूने पुणे शहराची हद्द आणि दुसऱ्या बाजूने आवटी पार्कमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील या परिसरात मोठ्या प्रमाणात आलिशान सदनिकांचे गृहप्रकल्प साकारले आहेत, कनेक्टिव्हिटीमुळे आयटीयन्स, नोकरदार व व्यावसायिकांचे वास्तव्या वाटले. उच्चभ्रू सोसायट्यांचे मोठे जाळे तयार झाले

मोठमोठ मॉल्स, मल्टिस्पेशालिटी रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल्स अशा सुविधांमुळे या भागातील घरांना मागणी वाढली आहे. गृहप्रकल्पांबरोबर वाकडमध्ये महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबविले गेले. विकास आराखड्यातील अनेक रस्ते विकसित करण्यात आले आहेत, अर्थन स्ट्रीटनुसार प्रशस्त रस्ते विकसित केल्यामुळे वाकडच्या सौदर्यात भर पडली.

यासह उद्याने, क्रीडांगणासारख्या सुविधा दिल्या जात आहेत. बाकड, पनावळे आणि ताथवडे या ठिकाणी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, इंदिरा कॉलेज, बालाजी इन्टिटयूट, जेएसपीएम कॉलेज अशा मोठ्या शिक्षण संस्थांची संकुले तयार झाली आहेत, लोकांना राहण्यासाठी प्रदूषणविरहित लोकेशन म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. स्मार्ट सिटी प्रकल्प राचविण्यापूर्वीपासून पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्यात याकड, पुनावळेसारख्या या परिसराचा मोठा वाटा आहे,

पुणे-मुंबई कॉरिडॉरवरील सर्वाधिक हायटेक परिसर
मुंबई-बंगळुरू महामार्ग, पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे या महामार्गामुळे पुणे-मुंबई कॉरिडॉरवरील हा सर्वाधिक हायटेक परिसर म्हणून ककडसह या संपूर्ण भागाचा समावेश होतो, यासह सांगती-रावेत बीआरटी, नाशिक फाटा-वाकड बीआरटी, औंध-हिंजवडी मार्ग आणि अंतर्गत प्रशस्त रस्त्यांमुळे तसेच ताथवडे व पुनावळे सब-वे करणे, भूमकर चौक, बाकड सब-वे, उाणपूल यामुळे हिंजवडी आयटी पार्क या भागातून पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व भागाशी कनेक्टिव्हिटी आहे.

त्यातच शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. या मेट्रोचा फायदा या परिसरातील नागरिकांना होणार आहे. मुळा नदीसुधार प्रकल्पामुळे या भागाच्या सौदर्यात तसेच विकासात भर पडेल. यासह महापालिकेकडून वाकडमध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन हॉल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापूर्वीच्या विकासकामामुळे आणि नव्याने होणाऱ्या प्रकल्पांमुळे हा संपूर्ण परिसर आणखी हायटेक होत असल्याचेच दिसते आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *