पुणे : चहुबाजुंनी हिरवे डोंगर, उत्कृष्ठ पायाभूत सुविधा, नामवंत शैक्षणिक संस्था, मुंबई- सातारा महामार्ग, पर्यायी रस्ते तसेच नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी टोलेजंग आलिशान इमारती, अशा सुखसुबिधा असलेला परिसर म्हणून पुणे शहराच्या पश्चिमेस असणारा बावधन बुद्रुक व परिसर ओळखला जातो. बावधन हे पुण्याच्या पश्चिम बाजूला असलेले हे एक चकाचक उपनगर म्हणून उदयास आले आहे.

‘हिंजवडीची आयटीनगरीही येथून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. पुणे शहरही जवळ असल्याने उच्चशिक्षित चाकरमानी आणि व्यावसायिकांचे बावधन म्हणजे राहण्याचे उत्तम ‘ठिकाण झाले आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षात येथे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. नदीच्या पश्‍चिमेकडे बावधन खुर्द तर पूर्वेकडे बावधन बुद्ठुक, बावघन खुर्दैहे आधीच पुणे महापालिकेत असल्यामुळे त्याचा विकास गेल्या दशकभरात ज्या वेगाने बिकास झाला आहे, त्याचीच पुनरावृत्ती बावधन बुद्रुकमध्ये आज दिसून येत आहे.

एकेकाळी हिरव्यागार शेतीची झालर पांघरलेल्या बावधन बुद्ुकवर हिंजवडी, बाणेर आयटी क्षेत्रामुळे लक्ष केंद्रीत झाले आहे. बांधकाम व्यावसायिकांनी आलिशान इमारती उभारल्या आहेत. नोकरदार, व्यावसायिकांचे रेसिडेन्शियल डेस्टिनेशन झालेल्या या गावांचा चेहरामोहरा वेगाने हे. यामध्ये विविध बंगले, फार्महाऊस, निवासी अपार्टमेंट आणि सोसायट्या देखील आहेत.

या भागात क्लिनिक, एटीएम, मेडिकल शॉप, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, मंदिरे, किराणा, हार्डवेअर दुकाने, गार्डन हॉटेल अशा सर्व सुविधा आहेत, हे राहण्यासाठी सर्वात थंड आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे. बावधनमध्ये काही संरक्षण आस्थापने आहेत, ज्यामुळे ते हिरवेगार आणि सुस्थितीत आहे.

येथे पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी असून राजा दिनकर केळकर संग्रहालय हे प्रस्तावित आहे.

येथे श्री चैतन्य स्कूल, सूर्यदत्ता स्कूल, चेतन दत्ताजी गायकवाड स्कूल, रेयान इंटरनॅशनल स्कूल, एसएनबीपी स्कूल, पेरिविंकल स्कूल, श्री श्री रविशंकर बाल मंदिर अशा नामांकित शाळा आहेत. तसेच, सूर्यदना कॉलेज, जेएसपीएम, असिहंत कॉलेज तसेच एमआयटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही सर्व शैक्षणिक संकुले जवळच्या अंतरावर आहेत.

बावधन बुद्रुकचे शहरीकरण झाले असले तरी येथील ग्रामस्थ परंपरा, गावप्रथा, रीतिरिवाज आजही जपत असल्याचे दिसून येत आहे.

उत्कृष्ट रस्त्यांची बावधनला कनेक्टिव्हिटी

बावधन हे उत्कृष्ट रस्त्यांनी कोथरूड, पौड रस्ता, बाणेर, औध, पाषाण, पुणे विद्यापीठ आणि सूस यांना जोडलेले आहे. नुकत्याच झालेल्या एनडीए चौकातील (चांदणी चौक) पुलामुळे येथील वाहतूक सुरळीत होऊन याठिकाणी पोहोचणे शक्य झाले आहे. येथून शिवाजीनगर रेल्वे स्थानक सुमारे १० कि. मी. तर पुणे रेल्वे स्थानक सुमारे १४ कि. मी. अंतरावर आहे आणि पुणे विमानतळ सुमारे २२ कि.मी. अंतरावर आहे. बावधनमधून पूर्ण महानगरपालिका, युनिव्हर्सिटी सर्कल, हिंजवडी, पाषाण सर्कल, कोथरूड, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना आणि पुणे स्टेशन या ठिकाणी थेट बसेस उपलब्ध आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *