पिंपरी : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरालगत असणारा ताथवडे हा सर्वाधिक चांगला परिसर आहे. त्यामुळे अनेकांची पसंती या भागाला असून, मोठ्या प्रमाणात घरांची मागणी वाढली आहे. सर्वाधिक पसंती ताथवडे परिसराला मिळत आहे. त्यानंतर रावेत व पुनावळे असा ग्राहकांचा पसंतीक्रम राहिला आहे. ताथवडेचा समावेश महापालिकेत झाल्यापासून विकास होत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था उभा राहत आहेत. त्यामुळे नागरिकांचे राहणीमान वाढत आहे. यासोबतच अन्य सोयीसुविधांबरोबर प्रशासनाच्या सेवाही उपलब्ध होत आहेत.
औद्योगिकनगरी पिंपरी चिंचवडचा पश्चिम पट्टा म्हणजे झपाट्याने विकसित होणारा भाग. यात पिंपळे निलख, चाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुडों आदी गावांचा समावेश आहे. त्यातील ताथवडेची ओळख गेल्या वर्षापासून शैक्षणिक हब म्हणून होत आहे, आता आरक्षणांची जागा ताब्यात आल्याने उद्याने, रस्ते विकसित होत आहेत. परिणामी, बांधकाम व्यवसायाला चालना मिळाली आहे. गगनचुंबी इमारती असलेले गृहप्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे ताथवडेला नागरिकांनी घर घेण्यासाठी पसंती दिली आहे.
मुळशी तालुक्यातील ताथवडे गावाचा २००१ मध्ये महापालिकेत समावेश झाला देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग आणि सांगवी-रावेत बीआरटी मार्ग यामुळे दोन्ही गावांचे तीन भागांत विभाजन झाले आहे. आता नवीन रस्ते विकसित होत आहेत. रस्त्याच्या कडेला पदपथ, रस्ता दुभाजकामुळे सुरक्षा व्यवस्था, झाडांमुळे खुलणारे रस्त्यांचे सौंदर्य, जमिनीखालून जाणाऱ्या जलवाहिन्या, सांडपाणीचाहिन्वा, पावसाळी जलवाहिन्या वीजवाहिन्या, इंटरनेटवाहिन्या आहेत. उद्याने विकसित केले जात आहेत. या भागातील आधुनिक व मूलभूत सुविधांमुळे नागरिकांच्या चेहन्यावर आनंद आहे. चेगवेगळ्या शैक्षणिक संकुलामुळे शैक्षणिक हबकाडे गावांची वाटचाल सुरू आहे
ताथवडेतील नृसिंहाची स्वयंभू मूर्ती
ताथवडे गावात विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नृसिंहाचे मदिर आहे. ताथवडे गावाचे है ग्रामदैवत असून, मंदिरात नृसिंहाची स्वयंभू मूर्ती आहे. ही मूर्ती नवव्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तविला जातो. तसेच मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून गावकऱ्यांनी या मंदिराचा जीणोद्वार केला आहे. नृसिंह मंदिराचे बांधकाम हे दाक्षिणात्य पद्धतीने करण्यात आले असून तमिळनाडू येथून कुशल शिल्पकारांनी मंदिराची अंतर्गत व बाहेरील शिल्पकला केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. वैशाख शुद्ध चतुर्वशी ही तिथी नृसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते.
कनेक्टिव्हिटीमुळे मिळतेय पसंती..
इंदिरा कॉलेज, राजर्षी शाहू कॉलेज अशा संकुलांमुळे शैक्षणिक हय अशी ओळख आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व जुना मुंबई-पुणे महामार्ग काही मिनिटांच्या अंतरावर आहे देहूरोड, आकुर्डी, चिंचवड रेल्वेस्टेशनही जवळ आहे सांगवी-किवळे बीआरटी मार्गामुळे पुणे, पिंपरी, चिंचवड, आकुर्डीशी कनेक्टिव्हिटी आहे. हिंजवडी-माण आयटी पार्क, बाणेर, बालेवाडी काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. तर, बाहेरगावी जाण्यासाठी म्हणजे मुंबई-बंगळरू महामार्गामुळे मुंबईसह सातारा, कोल्हापूरला जाता येते.